नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांसाठी आ. अनिल पाटलांचा प्रशिक्षण वर्ग ! ( व्हिडीओ )

जळगाव सचिन गोसावी । जिल्ह्यात सर्वाधीक २१ ग्रामपंचायती या अमळनेर तालुक्यात बिनविरोध झालेल्या आहेत. तर उर्वरित ठिकाणी सुध्दा महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार असल्याचा आत्मविश्‍वास आमदार अनिल भाईदास पाटील यांना आहे. एवढेच नव्हे तर नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांनी विकासाभिमुख वाटचाल करावी यासाठी निकालानंतर लागलीच प्रशिक्षण वर्गाचे आयोजन देखील त्यांनी केली आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार अनिल पाटील म्हणाले की, सर्वत्र जाती-पातीचे राजकारण होत असतांना अमळनेर तालुक्यात मात्र विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाली आहे. विधानसभेत ज्याप्रमाणे भूमिपुत्र या संकल्पनेतून तालुका एकवटला होता. त्याच प्रकारे जिल्ह्यात सर्वाधीक २१ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आल्या आहेत. याशिवाय, उर्वरित ग्रामपंचायतीतही महाविकास आघाडीलाच यश मिळणार आहे. तालुक्यात एकूण ८९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून यातील जवळपास ८० ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या सदस्यांनी विकासाभिमुख वाटचाल करणे आवश्यक आहे. यासाठी निकाल लागल्या बरोबर आपण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

खालील व्हिडीओत पहा आमदार अनिल पाटील नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/237915561048105

Protected Content