Home राजकीय म्हणून…नवख्या पार्थला फासावर लटकवता का? : अजित पवार

म्हणून…नवख्या पार्थला फासावर लटकवता का? : अजित पवार

0
101


parth and ajit pawar
 

पुणे (वृत्तसंस्था) पार्थ राजकारणात नवखा आहे. नवख्याकडून चूका होत असतात म्हणून त्याला फासावर लटकवता का? अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

 

वारंवार विविध कारणाने पार्थ पवारला सोशल मिडीयात ट्रोल व्हावे लागत असल्याने पार्थचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार संतप्त झाले आहेत. पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिस्ती धर्मगुरुकडे जाण्याचे कृत्य चुकीचेच होते. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. मात्र, मी त्याला समजावून सांगितले,असे अजित पवार म्हणाले. सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जावं लागते. ही गोष्ट अजित पवारांनी केली असती, तर ती चूक ठरली असती. पण पार्थकडून ते नकळत झाले. पार्थ पवारांनी गेल्या आठवड्यात विनियार्ड वर्कर्स चर्चला सदिच्छा भेट दिली. यावेळी फादर डॉ. पीटर सिल्व्हा यांनी विजयासाठी आशीर्वाद दिले होते. हे फादर पीटर सिल्वा म्हणजे केवळ देवाला प्रार्थना करुन हृदयरोगासारखा आजार बरा करण्याचा दावा करणारे धर्मगुरु आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound