चोरवड येथे अपघात; एक ठार

Accident

 

रावेर प्रतिनिधी । अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर मध्यप्रदेशच्या सीमेलगतच्या चोरवड गावाजवळ आज दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, बऱ्हाणपूरकडुन भरधाव वेगाने येत असलेल्या महेंद्र पिकअप ( क्रमांक एमएच १५जीव्ही ०८९०) ने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल स्वारचा जगीच मृत्यु झाला आहे. प्रकाश पंडीत महाजन असे मृत्यु व्यक्तीचे नाव आहे. महाजन हे रावेरहून आपल्या नातेवाईकांकडून बऱ्हाणपूर कडे जात होते. या अपघात मोटारसायकलचा चुरा झाला असून गाडी हवेत 10 ते 15 फुट उंच उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस जितेंद्र जैन, पोकॉ. श्रीराम वानखेडे, चालक हर्षल पाटील यांनी धाव घेत मयतास रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. महेंद्र पिकअप गाडी चालक योगेश अंबादास खरात रा. पिपळगाव ता. निफाड यांच्याविरुद्ध रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला, असून खरात याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Protected Content