संजय राऊत म्हणतात विधानसभा बरखास्तीच्या दिशेने

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून विधानसभा बरखास्त तिच्या दिशेने असल्याचे सूचित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

आज सकाळपासून अनेक नाट्यमय राजकीय घटना घडत असून यामुळे आता नेमके काय होणार हे कुणालाच काही कळेनासे झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच ट्विट करून विधानसभा बरखास्तीच्या दिशेने जात असल्याचे नमूद केले आहे. यामुळे आज दुपारी होणार या बैठकीमध्ये विधानसभा बरखास्त होणार का ? याबाबत उत्सुकता लागली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content