मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था । राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. दरम्यान यांच्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली असली तरी याला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात आली असून यात विधानसभा भंग करण्यात येईल असा अंदाज मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अचानक कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे आता या बंडाचे नेमके पुढे काय होणार याबाबत देखील संभ्रमाचे वातावरण निर्मित झाले आहे.

Protected Content