सातगाव विकासो निवडणुकीत शेतकरी सहकारी पॅनलचा दणदणीत विजय

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील विकास कार्यकारी सोसायटी निवडणूकीचा नुकताच निकाल लागला असून प्रा. भागवत महालपूरे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनलने १३ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

दि. १९ जून रविवार रोजी संपन्न झालेल्या वि. का. सोसायटीच्या निवडणुकीत प्रा.भागवत महालपूरे यांच्या नेतृत्वा खाली लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनलने १३ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला असून  महिला राखीव जागा फक्त १ मताने तर इतर मागास प्रवर्गातील जागा फक्त २ मतांनी पराजित झाल्या आहेत. शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले असून सातगाव सोसायटीतील  शेतकरी सभासदांनी पुन:श्च प्रा.भागवत महालपुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आमच्या प्रतिनिधीने प्रा. भागवत महलपुरे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधला असता त्यांनी या विजयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनेतील स्थानिक प्रामाणिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे.

यात प्रामुख्याने शंकर पवार, सुभाष पाटील, रज्जाक तडवी, भागवत पाटील, समाधान पाटील, भरत राठोड, आबा बच्छे, शकीला तडवी, सतीश पाटील, संजय तडवी, शरीफ पठाण, अंबादास अल्हlट, पंडित डांबरे, भगवान मंदाडे तसेच आकाश महालपूरे यांच्यासह अनेक  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच मिरवणुकीने गावकऱ्यांचे आणि सभासदांचे आभार मानण्यात येऊन शेवटी श्री विठ्ल – रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात आभार सभा घेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content