यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील तालुकास्तरीय जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांची सहविचार सभा यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषया संदर्भात वी लर्नं इंग्लिश ह्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावल नगर परिषदव्दारे संचालीत प. पु . साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्या उपस्थितीत व पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे सर्व केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक तज्ञ सुलभक शिक्षक गटसाधन केंद्र विषय तज्ञ साधन यावल व शैक्षणीक क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ अखेर प्रत्येक दिवसाला इंग्रजी विषया संदर्भात अभ्यासक्रम निश्चित करून आराखडा तयार करण्यात आला व दैनंदिन अध्यापनात व परिपाठा प्रसंगी सदर उपक्रम घ्यावयाचा असून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सदर उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.