‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त नशिराबाद शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी

नशिराबाद, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात मराठी राजभाषा दिवस निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष मुख्याध्यापक प्रविण महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून किमान कौशल्य विभागाचे प्रा. प्रदीप पाटील, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा संगीता माळी व अंकिता वाणी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मराठी संस्कृतीची वेशभूषा सर्व विद्यार्थांनी परिधान केली होती. यात मॉ जिजाऊ, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, तानाजी मालुसरे, संत तुकाराम, वारकरी, विठ्ठल, साने गुरुजी, अहिल्याबाई होळकर, प्रतिभाताई पाटील, डॉ बाबासाहेब असे अनेक पोशाख परिधान करून विद्यार्थांनी अभिनय सादर केला.

या कार्यक्रमाचे नियोजन तुषार रंधे व पूजा पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content