विद्यापीठातील प्रथम वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत प्रवेशित प्रथम वर्ष बी.टेक.च्या विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम १४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या काळात उत्साहात पार पडला.

संचालक प्रा. जे.बी. नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शिक्षक- पालक सभेचे आयोजन करण्यात आले. १५ दिवसांच्या या कार्यक्रमात रोज योग शिक्षक कृणाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्ग घेण्यात आले. विविध क्षेत्रातील तज्ञांनी रोज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रा. विशाल पराते, प्रा. रवींद्र पुरी, प्रा. तुषार देशपांडे, प्रा. आर.पी. गोरे, फॉरेन्सिक तज्ञ गौरव वराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, प्रा. जी.ए. उस्मानी, प्रा. मधुलिका सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. संविधान दिनी उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. प्रा. म.सु. पगारे यांनी संविधान विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विनीत काकडे, डॉ. विकास पाटील, डॉ. सुनील मराठे, डॉ. सुजाता शिंदे, प्रा. प्रज्ञा सुरवाडे, डॉ. पराग पाटील, प्रा. विश्वनाथ तायडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content