यावल तालुक्यातील अनेक महिलांचा आरपीआय आठवले गटात प्रवेश

yaval baithak 1

यावल प्रतिनिधी । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची नुकतीच एक बैठक महिला जिल्हा अध्यक्ष नंदा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली रावेर विधानसभा अध्यक्ष विकास भास्कर यांच्या फार्म हाऊस येथे घेण्यात आली. यावेळी बैठकीत तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक महिलांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटात प्रवेश केला.

यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आंनद बाविस्कर यांनी बैठकीत उपस्थितीत कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन करतांना सांगितले की, देशाचे मंत्रीपद भुषविणारे ना. रामदास आठवले यांचा हा गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यात सदैव प्रयत्नशील राहणारा पक्ष आहे. भविष्यात देखील राहणार, आपल्या पक्षाची भुमिका व कार्य हे सर्वसामान्यापर्यंत पाहोचत असल्याने संपुर्ण जळगाव जिल्ह्यातून सर्व जातीधर्मातील लोक मोठया प्रमाणात रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितलं. तसेच पुढील काळात येवु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भातही बोलतांना म्हणाल्या की, भुसावळ हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आयत्या वेळीस पक्षात प्रवेश करणारे संजय सावकारे यांना उमेदवारी देवुन रिपाईपक्षावर अन्याय केला. परंतु२०१९च्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भुसावळ मतदार रि.पा.ईं.ला सोडण्यात यावा, ही आमची आग्रही भुमिका असेल, तसेच जिल्ह्यात कुठल्याही आमदारांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय दिलेला नसुन मागील संपुर्ण पाच वर्ष दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांना आपल्या हक्कापासुन लांब ठेवण्यात आले आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांचेच भले केले. परंतू या वेळेस आमची भुमिका स्पष्ठ करणार असल्याचे मत जिल्हाप्रमुख आनंद बाविस्कर यांनी व्यक्त केले. याचबरोबर यावेळी प्रवेश करण्या-या सदस्यांसह माहिलांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष चारूलता सोनवणे, जिल्हा सरचिटणीस मिनाक्षीताई पाटील, रिपाईचे यावल तालुका अध्यक्ष अरूण गजरे, महिला तालुका अध्यक्ष मंगला सावळे, विधानसभा अध्यक्ष विलास भास्कर, युवक अध्यक्ष चंदन अढायंगे, युवकचे जिल्हा कार्यध्यक्ष अशोक तायडे, निर्मलाताई लोहार, व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

Protected Content