शिवसेनेतर्फे राज्यपाल हटाव स्वाक्षरी मोहीमेस प्रारंभ (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे  राज्यपाल हटाव स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसं जिल्हाआधिकारी कार्यालयासमोर प्रारंभ करण्यात आला.

 

 

आज मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे  राष्ट्रपतींना जिल्हाआधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेक वेळा  महाराष्ट्रातील महापुरुषांचा व मराठी जनतेचा जाहीर अपमान केला आहे. नुकताच त्यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढून त्याचा अपमान केलेला आहे. आम्ही महाराष्ट्राचे अस्मिता जपणारे मराठी बांधव व भगिनी आपणास निवेदन सादर करतो की, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना लक्षात घेवून तात्काळसध्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल या पदावरून बरखास्त करावे व नवीन आदर्श निर्माण करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, गायत्री सोनवणे, चारुलता सोनवणे, आशिष सपकाळे, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, जाकीर पठाण, विजेंद्र कोळी, जितेंद्र पाटील, पुरीद मिशीर खान आदींची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content