विकृतीचा कळस : पतीचा पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. गेल्या वर्षभरापासून आपल्या पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात पती-पत्नी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २७ जानेवारी रोजी २०२२ पासून पती हा पत्नीसोबत विकृत पध्दतीने अनैसर्गिक कृत्य करीत होता. हा प्रकार करण्यासाठी पती बळजबरी करीत होता. याला विरोध केल्यावर विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करत होता. अनैसर्गिक कृत्य करण्यास नकार दिल्यास तिला जीवेठार मारण्याची धमकी देत होता. हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने अखेर शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून पतीविरोधात तक्रार दिली आहे. बुधवारी १ फेब्रवारी रोजी रात्री ८ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.

Protected Content