कै.कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आर्थिक मदत

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | येथील कै. कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त पहूर पेठ, पहूर कसबे व पाळधी येथील १६३ दिव्यांग व्यक्तींना कोरोना काळात आर्थिक मदत देण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कै. कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिरासह नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेचे मार्गदर्शक प्रदिप लोढा, संजय गरूड, व संस्थेचे चेअरमन बाबूराव पांढरे, कार्यलक्षी संचालक कैलास पाटील व संचालक मंडळ,यांच्या प्रेरणेतून येथील पतसंस्थेतर्फे पहूर पेठ चे ९४, पहूर कसबेचे २४, व पाळधी येथील ४५ असे एकूण १६३ दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी २०१ रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक मदत करण्यापूर्वी कै. कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत संस्थेचे मार्गदर्शक प्रदिप लोढा, दिव्यांग नवी दिशाचे अध्यक्ष रवी नारायण झाल्टे, संस्थेचे चेअरमन बाबुराव पांढरे, व्हा.चेअरमन प्रताप परदेशी, कार्यलक्षी संचालक कैलास पाटील, उपसरपंच श्याम सावळे, शैलेश पाटील, किरण पाटील, पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्व १६३ दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत घरपोच दिली जाणार असल्याचे संस्थेचे मार्गदर्शक प्रदिप लोढा यांनी सांगितले.

Protected Content