शिवरायांचे लोककल्याणकारी ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजे लोकांनी, लोकांसाठी निर्माण केलेले राज्य – व्याख्याते पंकज रणदिवे

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा पाया हाच लोककल्याण हा होता. त्यांनी कुठलीही शाही निर्माण केली नाही तर त्यांनी ‘स्वराज्य’ निर्माण केले. सामान्य शेतकरी, कष्टकरी घरातल्या मुलांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.सामान्य लोकांचे राज्य उभे केले. शिवरायांचे लोककल्याणकारी ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजे लोकांनी, लोकांसाठी निर्माण केलेले राज्य, असे प्रतिपादन रयत सेनेच्या वतीने शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल मंदिर सभागृहात दि. १९ रोजी सकाळी ११ वाजता शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानात व्याख्याते पंकज रणदिवे यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळा व राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा बॅंक संचालक प्रदीप देशमुख, प.स. सभापती अजय पाटील, माजी नगरसेवक रामचंद्र जाधव,माजी नगरसेविका विजया पवार, रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश अध्यक्ष संता पैलवान यांच्या हस्ते करण्यात आले. व्याखाते पंकज रणदिवे पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याचे शपथ घेतली.

रयतेचे स्वराज्य निर्माण करून शिवाजी महाराजांनी आपल्या समोर एक आदर्श निर्माण केला त्यांचे विचार  आपण सर्वांनी आत्मसात केले तर लोककल्याणाचे कार्य आपल्या हातून घडेल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले. तदनंतर सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे माजी सैनिक गोकुळ पाटील,राहुल वाकलकर,आदर्श शिक्षक बाळु पवार,कवी दिनेश चव्हाण तर विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा रयत सेनेच्या वतीने सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विचार मंचावर महानंदा डेअरी संचालक प्रमोद पाटील ,बेलगंगा कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, बापजी जिवनदिप चे संचालक डॉ संदीप देशमुख, रा वि संचालक सुधीर पाटील, माजी जि प सदस्य किशोर पाटील, प स सदस्य बाजीराव दौंड, अमोल घोडे, हिरापूर ग्रा प उपसरपंच संतोष निकुंभ, पत्रकार एम बी पाटील, माजी नगरसेवक संजय राजपुत,दीपक पाटील, चिराग शेख,अजय शुक्ल,जयश्री रणदिवे,किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र जैस्वाल बोलताना म्हणाले  शिवजयंती ही विचाराची शिवजयंती रयत सेनेने आज साजरी केली असे सांगत गणेश पवार यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमास माजी नगरसेवक सुरेश चौधरी,मिलींद शेलार ,बापु पवार,खुशाल पाटील,सचिन पवार ,योगेश पाटील,दिपक राजपुत,प्रशांत गायकवाड,बाळासाहेब फाटे ,भिकन पवार,जी जी वाघ,मुकुंद पाटील,सुधीर शिंदे ,मनोज पाटील,अनिल कापसे ,आर बी जगताप,बबन पवार , किशोर शेळके ,नितीन माळे,सतीश पवार,प्रा रवि चव्हाण,नाना तांबे ,विनायक मांडोळे, देवानाना जाधव,किरण पवार, अनिल कापसे,मनोहर पवार ,अमोल पवार,दिलीप बिराजदार,निंबा पाटील,प्रा श्यामकांत निकम आदि तर रयत सेनेचे पि.एन पाटील, ज्ञानेश्वर कोल्हे ,प्रमोद पाटील,संजय कापसे,विलास मराठे,प्रदीप मराठे ,विलास मराठे,भरत नवले,छोटु अहिरे, दिपक देशमुख, अनिल कोल्हे,दत्तु पवार, तात्या पाटील, अमोल देठे, नितीन महाजन,विकास बोंडारे,दिपक एरंडे, गणेश पवार,प्रशांत अजबे, दिलीप पवार ,संजीव पाटील, तुषार देसले, भरत कुटे, समाधान डोगरे  उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वप्नील गायकवाड, मुकुंद पवार,अनिकेत शिंदे,मयुर पवार,चेतन पवार,मंगेश देठे, निखिल पवार, संदीप पवार,हितेंद्र मगर, प्रज्वल पवार,गणेश पवार यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नागमोती यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश चव्हाण यांनी केले,

 

 

 

 

 

 

Protected Content