भाजपातर्फे नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नैतिकता हरपली असून यामुळे त्यांनी पंतप्रधानांबाबत बेताल वक्तव्य केले आहे. यांचा निषेध करतांना त्यांना आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी दिला.

भाजपच्या जिल्हा कार्यालयातून टॉवर चौकात जाण्यासाठी निघतांना जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ,जिल्हा परिषद अध्यक्ष ना. रंजनाताई पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, हर्षल पाटील, उपाध्यक्ष पद्माकर महाजन, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष  अजय भोळे, प्रल्हाद पाटील,कांचन फालक,महिला आघाडीच्या दीप्ती चिरमाडे, जिल्हा चिटणीस सविता भालेराव, रवींद्र पाटील, संतोष खोरखडे, राजेंद्र सोनवणे, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत पाटील, जि.प.शिक्षण सभापती रवींद्र पाटील, आत्माराम म्हाडके, मंगेश पाटील, अमोल शिंदें, कांतीलाल जैन, आरिफ शेख, विलास चौधरी, तुकाराम निकम, दीपक तायडे, बाबुराव घोंगडे, डॉ.प्रशांत बोडे, राजन लासुरकर, वासुदेव नरवाडे, महेश चौधरी, सचिन पवार,गोपाळ भंगाळे, ललित बऱ्हाडे,भाऊसाहेब पाटील,गिरीश वराडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. भाजपच्या जिल्हा कार्यालयातून टॉवर चौकापर्यंत नाना पाटोले यांच्या निषेधाच्या घोषणा देत रॅली काढण्यात आली. ही रॅली टॉवर चौकात आली असता कॉंग्रेस व नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी नाना पटोले यांच्या पोस्टरला शेण फासून, जोडा मारो आंदोलन करत पोस्टरचे दहन केले.

 

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/698270454886517

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/677116649977314

Protected Content