विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप

umavi

जळगाव (प्रतिनिधी)। विद्यापीठातील विविध संघटनांनी एकत्र येऊन विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगला गू करण्यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीजवळ घोषणाबाजी करत आज (दि.२९) एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे.

या संपात महाराष्ट्र विद्यापीठ महासंघाच्या निर्देशान्वये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना, उत्तर महाराष्ट्र मागासवर्गीय संघटना व महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम ह्या संघटनेतर्फे विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह अन्य तातडीच्या मागण्या मंजूर करण्यासाठी विद्यापीठातील सुमारे ४०० ते ४५० कर्मचारी-अधिकारी यांनी एकत्र येवून हा संप पुकारला आहे. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास १५ जूलैपासून कोणत्याही क्षणी बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र विद्यापीठ संघाचे अध्यक्ष रमेश शिंदे, अरूण मुरलीधर सपकाळे, जयंत रामदास सोनवणे, राजू रतन सोनवणे आदींसह कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या
विद्यापीठीय व अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्य वेतनसुधार समितीच्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचनेनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या तरतुदींमध्ये सहाव्या वेतन आयोगाच्या सुधारित संरचनेच्या अनुषंगाने सुधारित नियम लागू करण्याच्या संदर्भात शासन निर्णय केवळ वित्त मंत्रालयाची मान्यता नाही, या कारणास्तव रद्द केले. हे शासन निर्णय वित्त विभागाची कार्योत्त्तर मंजूरी घेऊन पूर्ववत लागू करणे, राज्य मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभाग, तसेच वित्त विभागाने राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू शासन निर्णयातील तरतूदी अकृषी विद्यापीठीय व अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करणे, राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील, तसेच अशासकीय महाविद्यालयांमधील सध्या रिक्त असलेली सर्व पदे सुधारित आढाव्याच्या अधिन राहून विनाशर्त सरळसेवा, तसेच पदोन्नतीने भरण्यास त्वरित अनुमती देणे, अशा प्रमुख मागण्या आहेत.

Protected Content