विधानभवनाच्या पायर्‍यांवर नाथाभाऊ अडखळले !

मुंबई-वृत्तसेवा | आमदार एकनाथराव खडसे हे आज विधानपरिषदेत जातांना पायर्‍यांवर अडखळले, मात्र सुदैवाने त्यांना काहीही दुखापत झाली नाही.

या संदर्भातील वृत्त असे की, सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून आ. एकनाथराव खडसे हे विधानपरिषदेचे सदस्य असून ते आज सकाळी अकराच्या सुमारास सभागृहात जाण्यासाठी आले होते. याप्रसंगी अचानक ते पायर्‍या चढतांना अडखळले. त्यांचा तोल गेल्यासारखा वाटत असतांनाच सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सावरले. अवघ्या काही सेकंदात ते पुन्हा सावरून सभागृहात गेले.

दरम्यान, आमदार एकनाथराव खडसे यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसून यानंतर त्यांनी विधानपरिषदेच्या कामकाजात नेहमी प्रमाणे भाग घेतला.

Protected Content