जळगाव पब्लिक स्कूलच्या विद्यार्थाची पुरातन वस्तुसंग्रहालयाला भेट

WhatsApp Image 2020 01 09 at 12.01.48 PM

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव पिपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित जळगाव पब्लिक स्कूलच्या २ री च्या विद्यार्थांनी मंगळवार दि.८ जानेवारी रोजी पुरातन वस्तुसंग्रहालयाला भेट दिली.

पुरातन वस्तुसंग्रहालयाचे संस्थापक सतीश पाटील हे १९९५ पासून दुर्मिळ वस्तूंचे संग्रह करीत आहेत. त्यांनी विविध खगोलीय दुर्बिणी-कोन्वेक्स, गलिलिअन ,कॉमेट हंटर, प्लनेटरी, पक्षी निरीक्षण, रिफ्लेक्टर अशा विविध दुर्बिणीची माहिती दिली. दुर्मिळ परफुम बॉटल्स ,ज्वालामुखी उद्रेकातून व लाव्हारसातून निर्माण झालेले क्रिस्टल्स ,डिजिटल डायरी, पेजर, १९२५ पासूनचे रेडीओ संग्रह, १९६५-१९७० पर्यंत वापरण्यात येणारा वॉकीटोकि, ग्रह, तारे, सुर्यग्रहण, चंद्रग्रहण , उल्का, ग्रामोफोन यासंदर्भात विद्यार्थांना मार्गदर्शन केले. वस्तुसंग्रहालय भेटीचे आयोजन कैलास पाटील तसेच शाळेच्या मुख्याधापिका छाया पाटील यांनी केले. तसेच शाळेतील शिक्षिका शैला अमोदे व योगिता जोशी यांनी सहकार्य केले.

Protected Content