निर्भया प्रकरण : फाशीची शिक्षा रद्द करण्याबाबत दोषीची न्यायालयात मागणी

SupremeCourtofIndia

नवी दिल्ली प्रतिनिधी । देशभर गाजलेल्या निर्भया प्रकरणातील एका आरोपीने (विनय कुमार) याने फाशीची शिक्षा रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व ४ दोषींना दि.२२ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता एकत्रितपणे तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक ३ मध्ये फाशी देण्यात येणार आहे. यासाठी यूपीतील कारागृह विभागाने तिहारमध्ये फाशी देणाऱ्या व्यक्ती पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेशातील फाशी देणाऱ्या जल्लादांना बोलावले आहे. कानपूर येथे राहणारे जल्लाद आता वयस्क झाले आहेत. यामुळे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणीतील दोषींना मेरठ येथे राहणारे जल्लाद फाशी देईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

 

Protected Content