पानमसाला विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोल्हे हिल्स परिसरातील दुकानात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून २ हजार ३१८ रुपयांचा पानमसाला जप्त करण्यात आल्याची कारवाई मंगळवार २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली. याप्रकरणी रात्री ९ वाजता चंद्रकांत सत्यसिंग पाटील (३५, रा. न्यू लक्ष्मीनगर, कोल्हे हिल्स परिसर) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत पाटील यांचे सावखेडा शिवारात शिवशक्ती प्रोव्हीजन्स व जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. या दुकानात पानमसाला असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दुकानावर छापा टाकला. याठिकाणी राज्यात प्रतिबंधित असलेला २ हजार ३१८ रुपये किमतीचा पानमसाला जप्त करण्यात आला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी तालुका पोलिस ठाण्यात रात्री ९ वाजता फिर्याद दिली. त्यावरून चंद्रकांत सत्यसिंग पाटील या दुकानमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील करीत आहेत.

Protected Content