राष्ट्रवादी विधानसभेत ‘इतक्या’ जागा लढणार; अजित पवारांनी केली घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकतीच मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी विधानसभा निवडणूक महायुतीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी राष्ट्रवादी ८५ जगांवर लढणार असल्याची विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवणार यावरून रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे काही नेत वेगवेगळ्या प्रकारचे दावे करत होते. त्यामुळे महायुतीतच संभ्रम निर्माण झाला होता. आता अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठकीत ८५ जगा लढविण्याचा निर्णय झाल्याने तिन्ही पक्षातील नेत्यांचे दावे हवेतच विरल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठकीत ८५ जागा लढविण्याचा निर्णय झाला असला तरी महायुतीतील भाजप आणि शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content