महापरिनिर्वाण दिनी विद्यापीठात कवी संमेलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेच्यावतीने बुधवार ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कवी संमेलन घेण्यात आले.

या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे होते. विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. पवित्रा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कवी संमेलनात डॉ. विजय घोरपडे, राजु सोनवणे, भालचंद्र सामुद्रे, प्रा. कृष्णा संदानशिव, सुकन्या जाधव यांनी कविता सादर केल्या. प्रा. म. सु. पगारे यांनी देखील कविता सादर केली. गौरव हरताळे यांनी सुत्रसंचालन केले तर सुबोध वाकोडे यांनी आभार मानले.

Protected Content