भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ३० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करून अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव शहरात ३० वर्षीय विवाहिता ही आपल्या पती, आई-वडील व भाऊसह वास्तव्याला आहे. योगेश शिवाजी महाजन याने विवाहितेला त्याच्या दुकानात बोलावून जबरदस्तीने अत्याचार केले. एवढेच नाही तर विवाहितेवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ देखील काढले. त्यानंतर पुन्हा व्हिडीओ तुझा पती, आईवडील व भाऊला पाठवून देण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून वारंवार अत्याचार केले. तसेच विवाहितेचा अश्लिल शिवीगाळ करून धमकी देत होता. हा प्रकार विवाहितेला असहाय्य झाल्याने अखेर भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश शिवाजी महाजन याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.