जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; नऊ अटकेत; चौघे पळाले !

जळगाव प्रतिनिधी । औद्योगिक वसाहत परिसरात सुरू असणार्‍या जुगार अड्डयावर पोलसांनी धाड टाकत नऊ जणांना अटक करत सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला आहे. तर चार जुगारी मात्र धूम ठोकण्यात यशस्वी झाले आहेत.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

एमआयडीसीतील भारत गॅस पेट्रोलियमच्या पाठीमागे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली होती. या अनुषंगाने रोहन यांनी पथकाच्या मदतीने सोमवारी संध्याकाळी या अड्डयावर छापा टाकला. यात नऊ जुगार्‍यांना अटक करण्यात आली.

या कारवाईतचेतन बळीराम राणे (३५, रा.विठ्ठल पेठ), पवन आनंदराव ठाकूर (४५,रा.आहुजानगर), मिलिंद दौलत बिर्‍हाडे (४२), छोटू खंडू पाटील (४७, रा.असोदा), विशाल शरद खडके (३३), जितेंद्र अनिल सोनार (३३, रा.जुने जळगाव), दत्तू सुपडू पाटील (४५, रा.रामेश्‍वर कॉलनी) व गजानन समाधान हटकर (३५, रा.तांबापुरा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून १ लाख २६ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, कारवाई होत असतांना चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. उपनिरीक्षक मनोहर जाधव, किरण धमके, अनिल पाटील, रवींद्र मोतीराया, अशोक फुसे व विनयकुमार देसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Protected Content