गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खोटेनगर बसस्टॉप परिसरातून गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहनासह दोन बैल पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी गुरुवार, १५ सप्टेंबर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर गुरांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. असे असतांनाही गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. तालुका पोलिसांनी खेाटेनगर बसस्टॉप येथे ये जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता, एका वाहनात दोन बैल निर्दयीपणे कोंबलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी वाहन तसेच दोन्ही बैल जप्त केले. याप्रकरणी पोलीस नाईक प्रकाश चिंचोरे यांच्या फिर्यादीवरुन गुरांची वाहतूक करणाऱ्या एम.एच. ०३ ए.एच. ३८१५ या वाहनावरील चालक जाफर अली अफजल अली सय्यद वय २४ रा. पिंपळकोठा बुद्रूक ता.एरंडोल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड हे करीत आहेत.

Protected Content