म्हसावद येथे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियानाचे उद्घाटन महिला व बालकल्याण विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांच्याहस्ते थेपडे विद्यालयात शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.

याप्रसंगी प्रकल्प अधिकारी कोकिळा भोई, कृषी अधिकारी प्रतीक्षा सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, म्हसावद रुग्णालयाचे डॉ. नाशिककर, सरपंच गोविंद पवार, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुधाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्या शितल चिंचोटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संगीता चिंचोटे, सुरेखा पाटील, भारती कुमावत, ऐश्वर्या मंत्री, ग्रामसेवक मुरलीधर उशीर, केंद्रप्रमुख कैलास पवार, प्राचार्य एस. बी. सोनार, उपप्राचार्य जी. डी. बच्छाव, पर्यवेक्षक एस के भंगाळे, सीमा रॉय, सागर इंगळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात देवेंद्र राऊत आणि ग्रामपंचायत सदस्या शितल चिंचोटे यांच्यासह आदींनी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या अभियानांतर्गत पोषण आहार व भाजीपाला यांचे महत्त्व सांगून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रक्त वाढवण्यासाठी पोषक पदार्थ, स्तनपान व संपूर्ण आहार याबाबत यांच्या स्टॉल लावण्यात आले होते.

Protected Content