Home क्राईम जळगावात पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; वृध्दावर गुन्हा

जळगावात पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; वृध्दावर गुन्हा

0
89
child abuse for web 1526545324490
child abuse for web 1526545324490

जळगाव प्रतिनिधी । अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर एका ६० वर्षीय वयोवृध्दाने अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कुत्र्यांच्या पिल्लांसोबत पाच वर्षाची चिमुकली खेळत असतांना घराच्या बाजूला राहत असलेल्या रविंद्र पुना रंधे (वय-६५) याने सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुलीला गोड बोलवून घरात अत्याचार केले. दरम्यान मुलीला हा त्रास सहन होत नव्हता. तीने आपल्याला होत असलेल्या त्रासबद्दल आजीला सांगितला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान तिने आपबीती पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी त्याला पकडून जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, पिडीत मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात पोक्सो कायद्यानुसार नराधम रविंद्र रंधे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिलीप शिरसाठ करीत आहे.


Protected Content

Play sound