यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जे.टी. महाजन स्कुलमध्ये बालविवाहला विरोध, विधवा पुर्नविवाहस पाठींबा असे क्रांतीकारी निर्णय घेणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जंयतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
स्कुलच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुलच्या मुख्याध्यापक रजना महाजन व प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ किरण खेट्टे हे उपस्थिती होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरूवातीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्याध्यापिका रंजना महाजन यांच्याहस्ते लोकमान्य टिळक व समाजसुधारक लोककवी लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शाळेच्या शिक्षिका शिमोन तडवी व कोमल बडगुजर यांनी लोकमान्य टिळक यांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगितली तसेच सरोज येवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनाबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमामध्ये ४थी ते ७वी च्या विदयार्थ्यांनी भाषणा मध्ये सहभाग घेतला तसेच शाळेच्या शिक्षिका शारदा बडगुजर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर आधारित पोवाडा साभिनय सादर केला या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्य सौ रंजना महाजन मॅडम व डॉ किरण खेट्टे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे लता इंगळे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता कल्याणी महेश्वरी यांनी केली या वेळीस शाळेचे शिक्षक व शिक्षव्ंद उपस्थित होते.