बोगत खतामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी; राष्ट्रवादीचे निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सरदार कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिक धोक्यात आले आहे. पिकांची वाढ थांबली आहे. पीक कोरडे होवून लागल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १ लाख रूपये यांची मदत देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी  बोदवड तालुक्यातील बाधित शेतांची पाहणी केली. त्यानुसार मंगळवारी १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेवून चर्चा केली.  नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनाी खतांच्या वापरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना शासनाच्या माध्यमातून किंवा पिक विम्याच्या माध्यमातून हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी आणि बाधित शेतीवर शाश्वत उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.

जळगाव जिल्हयातील बोदवड, जामनेर, जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशी आणि अन्य पिकांना सरदार ऍग्रो फर्टिलायझर अँड केमिकल कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट या रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे तिन्ही तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती या बोगस खता मुळे बाधित झाली आहे. खत टाकलेल्या शेतातील कापसाची वाढ खुंटली तर काही ठिकाणी पिक खराब झाले यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीची मशागत, बियाणे, खते, खुरपणी, फवारणी, इ. आतापर्यंत शेतकरी बांधवांचा मोठा खर्च झालेला असताना या कंपनीच्या  सिंगल सुपर फॉस्फेट खतांच्या वापरामुळे शेतकरी बांधवांचे या हंगामातील पिक  वाया गेले आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शेतकरी हवालदील झाले.असताना आज अखेर सुदधा शासन शेतकऱ्याने पीक उपटून टाकावे की तसेच ठेवावे यावर मार्गदर्शन, उपाययोजना पुरवायला तयार नाही. हंगामाची वेळ निघत चालली आहे.त्यामुळे शेतकरी बांधवाना शासनाने किंवा पिक विम्याच्या माध्यमातून हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहिर करावी व असे बोगस खत विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करावा.  अशी मागणी देखील वेळी केली आहे.

याप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेसचे बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी,भरत पाटील, निलेश पाटील, विजय चौधरी, सतिष पाटील, प्रदिप बडगुजर, रिकू चौधरी, जगदीश कोळी,भगतसिंग पाटील, दिलीप पाटील, प्रदिप साळुंखे, चेतन राजपूत या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह मोहनसिंग पाटील, उर्मिला बाई पाटील, उमेश मातडे, आत्माराम नेवल, हरिदास पवार, उत्तम पाटील, निवृत्ती कोळी, सोपान पाटील, दिपक वाघ, जनार्धन खेलवाडे,सुरेश कोळी, कृष्णा वाघ, सुधिर खेलवाडे,दिनेश पाटील, भाग्यलक्ष्मी पाटील, धृपदा बाई पाटील, कैलास चौधरी, योगेश पाटील, निना पाटील हे शेतकरी बांधव उपस्थित होते.

Protected Content