…आणि खासदार व जि.प. अध्यक्षांसमोर पंचायत समिती सदस्या ढसाढसा रडल्या

रावेर प्रतिनिधी | सर्वांना संधी दिली जाते मग मलाच का डावलले जाते असे म्हणत रावेर पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे या खासदार रक्षा खडसे व जि.प. अध्यक्षा रंजना पाटील यांच्या समोर ढसा-ढसा रडू लागला.हा सर्व प्रकार तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या उदघाटना वेळी घडला.

याबाबत वृत्त असे की, पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे यांना उपसभापतीपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना संधी न मिळाल्याने आज खासदार रक्षाताई खडसे व जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील यांच्यासमोर त्यांच्या भावनांचा बांध फुटला. यावेळी उपस्थितांनी त्यांची समजूत काढल्याने त्या शांत झाल्या. मात्र राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला आहे.

यावेळी  जिल्हा परिषद सदस्य तथा सेवा व समर्पण अभियानाचे जिल्हाप्रमुख नंदकिशोर महाजन, उत्तर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष सुरेश धनके युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, माधुरी नेमाडे, जुम्मा तडवी, बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हाध्यक्षा सारिका चव्हाण, सरचिटणीस महेश चौधरी, माजी उपसभापती सुनिल पाटील, महेश पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे शहराध्यक्ष दिलीप पाटील, रजनीकांत बारी आदी यावेळी उपस्थित होते.

Protected Content