संजय तायडे यांचा उत्कृष्ट नायब तहसिलदार म्हणून जिल्हाधिकऱ्यांच्या हस्ते गौरव

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट निवासी नायब तहसिलदार म्हणून सजंय तायडे यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधिक्षक एम राजकुमार यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.  जनतेची कामे जलतगतीने करण्यात श्री तायडे यांची तालुकाभर ओळख आहे.

रावेर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार सजंय तायडे यांना महसूल दिना निमित्त जिल्हाभरात उत्कृष्ट निवासी नायब तहसिलदार म्हणून त्यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.  महसूल वसूली,अवैध गौण खनिज वरील कारवाया, विद्यार्थ्यांना लागणारे दाखले, इत्यादी कामे जलतगतीने करण्यात निवासी नायब तहसिलदार सजंय तायडे यांची ओळख असून या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.

Protected Content