कर्नाटकातील स्वस्त डिझेलची महाराष्ट्रात विक्री

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । कमी दर असलेले कर्नाटकातील डिझेल (Karnataka Diesel) महाराष्ट्रातील  सीमाभागात विक्रीच्या गोरखधंद्याने जोर धरला आहे. अधिकृत टॅंकरशी मिळतीजुळती असलेली रंगसंगती करून बेकायदेशीर छोट्या टॅंकरमधून जिल्ह्याच्या विविध हद्दीत दररोज ३० हजार लिटरच्या आसपास डिझेल विकले जात आहे. यातून शासनाचा महसूल बुडत असून, महाराष्ट्रातील अनेक पंपांना फटका बसत आहे

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात जवळपास साडेचार रुपयांनी डिझेल स्वस्त आहे. पेट्रोलही स्वस्त आहे, पण डिझेलची विक्री बल्कमध्ये होत असल्याने त्यातून फायदा कमावणारे काहीजण तयार झाले आहेत. त्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे. जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, कागल, हातकणंगले, शिरोळ या पाच तालुक्यांना कर्नाटकची सीमा  लागते.

सहा हजार लिटर क्षमतेचे बाऊझर अनेक पंपधारक मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वापरतात. त्याच धर्तीवर बाऊझर बनवले असून, त्यांची रंगसंगती अधिकृत टॅंकरशी मिळतीजुळती केली आहे. त्यामुळे सहज कुणालाही टॅंकरचा फरक समजत नाही. अशा बाऊझरमध्ये कर्नाटकातील सीमाभागातील पंपांवरून डिझेल घ्यायचे. जिल्ह्याच्या हद्दीतील पाच तालुक्यांत येण्यासाठी अनेक आडमार्ग आहेत. त्या आडमार्गाने रात्रीत येऊन कोणत्या तरी आडमार्गावर ते संबंधितांकडे रिकामे करायचे, असा प्रकार सुरू आहे.

Protected Content