
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील बसस्थानकासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेटने ८ वर्षाच्या बालकाला जोरदार धडक दिल्याने जखमी झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली होती. या प्रकरणी अखेर बुधवार ३१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, विराट विकास ससाने वय-८, रा. करजोत ता. रावेर हा त्याच्या आई पुनम विकास ससाने यांच्यासोबत भुसावळ शहरातील बस स्थानक येथे आलेला होता. दरम्यान बस स्थानक जवळून दोघे पायी जात असताना भरधाव वेगाने येणारे बुलेट क्रमांक (एमएच १९ बीए १५०१) वरील चालकाने विराट ससाने या बालकाला जोरदार धडक दिली. यात तो जखमी झाला त्याला तातडीने भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर बुधवार ३१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पुनम विकास ससाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. शशिकांत तायडे हे करीत आहे



