विचार वारसा फाउंडेशनतर्फे शिवजयंती समिती गठित

अध्यक्षपदी सागर पाटील तर सचिवपदी आशिष राजपुत, अभिजित राजपूत


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |
: येथील विचार वारसा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सागर नंदलाल पाटील यांची तर सचिवपदी-आशिष राजपूत, आणि अभिजित राजपूत यांची नियुक्ती झाली आहे.

विचार वारसा फाउंडेशनतर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी दरवर्षी साजरी करण्यात येते. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाही महोत्सव साजरा केला जाणार असून त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी नुकत्याच एका बैठकीत कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी सागर नंदलाल पाटील यांची एकमताने निवड झाली तर उपाध्यक्षपदी मयुर डांगे,आकाश तोमर यांची निवड झाली. मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनी येथे असणाऱ्या मोठ्या हनुमान मंदिर परिसरात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

उर्वरित कार्यकारिणीमध्ये सहसचिवपदी अमोल ढाकणे,अजय मांडोळे,मंगेश मांडोळे,संकेत म्हस्कर,गौरव डांगे,सोपान जाधव ,लोकेश निकम,यांची नियुक्ती करण्यात आली. तर सदस्यपदी- दिपक सनसे,राहुल पाटील,किशोर चौधरी, विशाल पाटील, बापू गवळी, देवेंद्र मराठे, मयूर पाटील, सचिन वाघ, ऋषी राजपूत, योगेश वाणी,सचिन कचरे,आकाश राजपूत, हर्षल बराटे,बबलू सपकाळे,मनोज निंबाळकर, विकी कचरे,अक्षय गवळी, दिपक तायडे, कल्पेश जाधव, राहुल राजपूत,भैय्या राजपूत, पवन काकडे,दिपक बादल, दिपक शेळके, रिंकू पाटिल,गोलू नाथ, चेतन राजपूत, आदींची निवड झाली आहे.

Protected Content