दाभोलकर-पानसरेंचे मारेकरी सापडत नसतील तर एकट्या मुख्यमंत्र्यांचा काय दोष?- शिवसेना

 

udav thakare and devendra fadnavis

 

मुंबई (वृत्तसंस्था) नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात आलेल्या अपयशावरून उच्च न्यायालयाने नुकतीच मुख्यमंत्र्यांची कानउघडणी केली होती. मात्र, दाभोलकर व पानसरेंचे मारेकरी सापडत नसतील तर एकट्या मुख्यमंत्र्यांना का जबाबदार धरता, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने फडणवीसांची बाजू उचलून धरली आहे. ‘सामना’तील या अग्रलेखात न्याय प्रक्रियेतील दिरंगाईबद्दलही अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आलेय.

पानसरे-दाभोलकरच नाहीत, तर लाखो गरीब आजही न्यायापासून वंचित आहेत व कोर्टाच्या पायऱया झिजवून त्यांचे आयुष्य संपले. पण त्यांना न्याय काही मिळाला नाही. मात्र म्हणून आमची न्यायालये बधिर किंवा अकार्यक्षम आहेत असा आरोप आम्ही करणार नाही. गरीबांना न्याय मिळत नाही व अनेकांना न्याय विकत मिळतो या भ्रमातून जनतेला बाहेर काढले नाही, तर न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडे जातील व देशाला ते परवडणारे नाही. हे सर्व करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही, अशी भूमिका या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. एकूणच या अग्रलेखाचा सूर पाहता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच दिलजमाई झाल्याचे दिसत आहे.

Add Comment

Protected Content