सी.आर.पी.एफ.च्या ताफ्यावर पुन्हा हल्ला ?

 

 

 

68642779

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीरमध्ये सी.आर.पी.एफ.च्या ताफ्याजवळ शनिवारी (दि.३० मार्च) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा ताफा तेथून जात असताना एका कारमध्ये हा स्फोट झाला. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या माहितीनुसार, एका सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या एका गाडीचे नुकसान यात झाले आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. जवळपास बसमध्ये ४० जवान होते. कारने सीआरपीएफच्या एका बसला जोरदार धडक दिली. त्यानंतर हा मोठा स्फोट झाला आहे. प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा तेथून जवळच होता.

Add Comment

Protected Content