दोन वर्षापासून फरार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

WhatsApp Image 2020 01 19 at 11.19.26 PM

भुसावळ, प्रतिनिधी | एकाला मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल, चांदीचे ब्रेसलेट व आधार कार्ड काढून घेत २ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले.

सविस्तर वृत्त असे की, मोहित महेश सोनी (रा. भुसावळ) याला श्री स्वामी समर्थ मंदिरा जवळ आरोपी पुतली, वसीमखान, अशफाक, सूर्या अशांनी  ८ सप्टेंबर २०१८ रोजी अडविले होते. त्यांनी मोहित सोनीस मारहाण करून त्याच्याजवळील ४४३०० रुपये किमतीच्या मोबाईल, चांदीचे ब्रेसलेट व आधार कार्ड जबरदस्तीने हिसकावून घेतले. या गुन्ह्यातील फरार आरोपी संजय उर्फ पुतली काशीनाथ मुक्तरे (वय-२७, रा. भारत नगर, मनमाड जिल्हा नाशिक) हा भुसावळ रेल्वे स्टेशनवर आला असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली होती. या माहितीनुसार स. पो. निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, पो.हे.कॉ. सुनील जोशी, पो. ना. रवींद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर,पो. कॉ. विकास सातदिवे, रवींद्र तायडे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे यांच्या पथकाने भुसावळ रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्र. ३ येथून ताब्यात घेतले.

Protected Content