संतापजनक : चार शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार

Rape Child crime

 

नांदेड (वृत्तसंस्था) सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बिलोली तालुक्यातील ४ शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, पीडित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

 

नांदेड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किमीच्या अंतरावर असणाऱ्या एका विद्यालयातील चार नराधम शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ देखील दाखवला. घडलेल्या सारा प्रकार या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. या अत्याचारानंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके यांच्यसह त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हे चारही शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार झाले आहेत. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात या चार नराधमांविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content