”व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग” कोर्स करणारी पाचोऱ्यातील पहिली कन्या सहिष्णा सोमवंशी

पाचोरा प्रतिनिधी । इंडियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत निमास संस्थेमार्फत विविध कोर्स घेतले जातात. त्यातीलच ”व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग” हा कोर्स सर्वात कमी वयात करणारी पाचोऱ्यातील सहीष्णा सोमवंशी ही पहिली कन्या ठरली आहे.

भारताच्या डीरांग (अरुणाचल प्रदेश) आणि आसाम च्या सिमेवर भारतीय सैन्य दलाने “नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनींग ए लीड स्पोर्ट्स” (निमास) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. याठिकाणी भारतातील विविध राज्यांमधुन महीला व पुरुष अकरा दिवसांचा कॅम्प करण्यासाठी येतात. यात आपत्कालीन परिस्थितीत उपयोग घेण्यासाठी भारतीय नागरिकांनी कसे सक्षम असावे ?

हा कॅम्प इंडिया मिनिस्ट्री अॉफ डेफेन्स ने बनवला असुन यात माउंटनींग, कुबा डायव्हिंग, पॅरा लायडींग, बायकींग, व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग आदी कोर्स घेतले जातात. याठिकाणी शुन्य डिग्री तापमान असुन हा खडतर कोर्स पुर्ण करावा लागतो. टेन्ट मध्ये राहणे, सैन्या प्रमाणे जेवण घेणे, यासोबतच अतिशय थंड पाण्यात राफ्टिंग करावे लागते. यासाठी बहुतांश पालक मुलांना पाठवण्याचे धाडस करीत नाहीत. परदेशात अशा कोर्स ला खुपच महत्व दिले जाते. त्यात जगात “व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग” मध्ये इंडियन आर्मी एक नंबरवर आहे. त्यामुळे भारतीय सैन्यातील अनुभवी प्रशिक्षकांकडुन हे सर्व कोर्स शिकवले जातात.

भारतातुन जळगांव जिल्ह्यातील पाचोऱ्यातील सहीष्णा सचिन सोमवंशी ही सर्वात कमी वयाची (१८ वर्ष) मुलगी म्हणून हा कोर्स केल्याने ती भारतातुन पहिलीच कन्या ठरली आहे. तिने हा बहुमान खान्देश ला दिला आहे. तिच्या यशात तिचे पालक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी व आई सुप्रिया सोमवंशी, आजोबा, आजी यांचा सहभाग आहे. सहीष्णा सोमवंशी ही ज्या टिम मध्ये गेली त्यात अकरा महिला सदस्यांचा सहभाग होता. शुन्य डिग्री तापमाना मध्ये हा खडतर कोर्स तीने सहजरीत्या पुर्ण केला. यात रेस्क्यू अॉपरेशन शिकवले गेले आहे.

प्रशिक्षण घेतांना येथे वास्तव्य करणेही आव्हानात्मक आहे. तब्बल सहा ते सात हजार कि.मी. चा प्रवास येथे जाण्यासाठी करावा लागतो. हे खडतर प्रशिक्षण घेऊन जेव्हा सहिष्णाचे शहरात आगमन होताच दत्त कॉलनीत तिच्या निवासस्थानी रांगोळी सह फटाक्यांची आतिषबाजी करुन तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सहिष्णाचे धैर्य बघुन प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर विश्वास ठेऊन हा कोर्स करण्यासाठी उत्तेजित करावे. या कोर्स मुळे प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. येणाऱ्या काळात ज्यांना हा कोर्स करायचा त्यांना मी मार्गदर्शन करेल असे सहीष्णा सोमवंशी हिने सांगितले असुन महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी या कोर्स साठी अनुदान द्यावे जेणेकरून येणाऱ्या काळात विद्यार्थी युवक, युवती मधील आत्मविश्वास वाढेल आणि चांगली भावी पिढी निर्माण होण्यासाठी मदत होईल अशी आशा सहीष्णा ने व्यक्त केली. सहिष्णा हिच्या धैर्याबद्दल तिचे परिसरातुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 

Protected Content