किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – शिवसेनेची मागणी (व्हिडीओ)

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आय.एन.एस. विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्या यांनी घोटाळा करुन देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्वरित तुरुंगात टाका या मागणीसाठी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीतर्फे किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

आज दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना, युवासेना व महिला आघाडीतर्फे किरीट सोमय्या यांच्या विरोधात प्रदर्शने व आंदोलन करण्यात आले.

यावेळी युवानेते सुमित किशोर पाटील, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, मा. नगरसेवक गंगाराम पाटील, बापू हटकर, बंडू चौधरी, प्रविण ब्राम्हणे, पिंटू शिंदे, संदीपराजे पाटील, जितेंद्र पेंढारकर, महिला आघाडीच्या बेबा पाटील, रेखा राजपूत, उर्मिला शेळके, सुनंदा महाजन, स्मिता बारावरकर, जया पवार,  शिवसेना, युवासेना महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन – २०१३ मध्ये आय. एन. एस. विक्रांत वाचवण्यासाठी किरीट‌ सोमय्याने मोहीम सुरू केली. केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शवल्यानं किरीट सोमय्या पुढे आले आणि प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर विमानतळावर डबे घेऊन उभे राहिले. आय.एन.एस.विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली.

नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले. या रकमेचे किरीट सोमय्याने काय केलं ? ते देशाला समजायला हवं, ही रक्कम तो भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होते. मात्र सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचं आर.टी.आय.मधून समोर आलं आहे.

लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने गद्दारी केली असून त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली. राजभवनानं आपल्याला किरीट सोमय्याकडून कोणताच निधीचा चेक मिळाला नसल्याची माहिती अधिकाराखाली मागविलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे. किरीट सोमय्याने गोळा केलेला पैसा राजभवनात जमा झाला नाही. मग तो कोणाच्या खिशात गेला ? हा पैसा कोणी खाल्ला ? ह्याची उत्तरे राज्यातील जनतेला मिळायलाच हवीत. या घोटाळ्यात किरीट सोमय्यांने अंदाजे १०० कोटींचा घोटाळा करून हे पैसे त्याच्या बांधकाम व्यवसायात गुंतवले आहेत त्यामुळे देशद्रोही किरीट सोमय्या यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा” अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

व्हिडीओ लिंक

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1103625333539459

Protected Content