पाचोऱ्यातील गो. से. हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

पाचोरा प्रतिनिधी । येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने चालवलेल्या गो. से. हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव, जिल्हा महिला शिक्षक संघटना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील उपशिक्षिका सुखदा पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा संस्थेचे चेअरमन संजय वाघ तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका पी.एम. वाघ यांनी केले. तर संस्थेचे चेअरमन संजय वाघ तसेच पर्यवेक्षक अजय अहिरे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या उदात्त कार्याचा आढावा घेतला. यावेळी श्वेता आवारे, भूमी पाटील, श्रावणी सोमवंशी, श्रुती शिंपी, शितल बोरुडे, जान्हवी पाटील, आकांक्षा कुहरे, सक्षम कौंडिण्य या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणातून खलील देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी व्यासपीठावर तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधीर पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे ईशस्तवन सागर थोरात आणि रुपेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले तर आभार सी. एल. जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content