चालत्या ट्रॅक्टरवरुन चक्कर येवून पडल्याने लासुरे येथील तरुणाचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोल्हे गावानजीक चालत्या ट्रॅक्टरवर चक्कर आल्याने ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार, दि. १५ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “लासुरे ता. पाचोरा येथील विजय शब्बीर तडवी (वय – ३२) हे ट्रॅक्टरद्वारे माती वाहण्यासाठी चालकाचे काम करुन आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते. दरम्यान आज गुरुवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विजय तडवी हे ट्रॅक्टर चालवित असतांना कोल्हे गावाजवळ त्यांना अचानक भुरळ आली आणि ते चालत्या ट्रॅक्टरवरुन खाली पडले.

खाली पडताच त्यांच्या उजव्या हातावरून ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक गेल्याने व खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले. सदरचा प्रकार सावखेडा येथील युवकाच्या लक्षात येताच विजय तडवी यांना प्रथम मोटर सायकलवरुन व नंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच विजय तडवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना दुर्दैवी मृत्यू झाला.

मयत विजय तडवी यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय तडवी यांच्या पाश्चात्य पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

Protected Content