शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबत शिवछावा संघटनेचे निवेदन

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबत शिवछावा संघटनेने तहसीलदार यांना निवेदन दिले.

शहरातील अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी, नगरपालिका घंटागाडी वेळेवर न येणे, बऱ्याच ठिकाणी गटारी भरलेल्या असणे, रोडावरील खड्डे बुजवणे, पाणी पाच दिवसाआड करणे, गावातील लाईट दुरूस्ती करणे, बसस्थानक मागील बोगदा येथे नवीन लाईट लावणे, आझाद चौकात व शहारातील स्ट्रीट लाईट बसविणे यासंदर्भात शिवछावा संघटनेने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी शिवछावा संघटनेचे उत्तर महा. संपर्क प्रमुख सागर भोसले, जिल्हाध्यक्ष राजेद्र चौधरी, तालुकाध्यक्ष गणेश पाटील, शहाराध्यक्ष ईश्वर पाटील, लोकेश महाजन, मनोज खत्री, वैभव पाटील आदी. उपस्थित होते.

Protected Content