१३७ कोटी रूपयांच्या अवैध गौणखनिज प्रकरणात दोषी अधिकार्‍यांना बडतर्फ करा : छत्रपती शिवाजी ब्रिगेड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातल्या अवैध गौणखनिज प्रकरणात तब्बल १३७ कोटींचा दंड ठोठावण्यात आला असून या प्रकरणात दोषी अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातून विविध भूखंडांच्या मधून अतिशय मोठ्या प्रमाणात अवैध गौणखनिज ( दगड, माती, मुरूम ) आदींचे उत्खनन करण्यात आल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजत आहे. यात संबधीत चार जागा मालकांना महसूल खात्यातर्फे गठीत करण्यात आलेल्या एसआयटीने तब्बल १३७ कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

विधानसभेतील आदेशानंतर नेमलेल्या एसआयटीने चौकशी अंती या प्रकरणात १३७ कोटी रुपये दंड ठोठावल्याचे आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा याबाबत कठोर भूमिका घेतलेली आहे. यामुळेच या प्रकरणात संबंधीत दोषींनी दाखल केलेला अर्ज उच्च न्यायालयाने खारीज केला आहे.

दरम्यान, शासनाचा गौण खनिज मध्ये एवढा मोठा महसूल बुडवला जात असताना असताना संबंधित जिल्हा गौण खनिज अधिकार्‍यांसह इतर अधिकारी आर्थिक प्रलोभनापोटी याकडे दुर्लक्ष करीत होते, हे यावरून सिद्ध झालेले आहे. याचाच अर्थ या अधिकार्‍यांनी शासकीय कर्तव्य न पाळता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे सारे केलेले दिसून आल्यामुळे यातील जबाबदार अधिकार्‍यांना तातडीने शासन सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर शासनाच्या आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने राज्याच्या मुख्य सचिवांकडे केलेली आहे.

सातोड शिवारातील अवैध उत्खननाचा प्रकार गंभीर असतांनाही महसूल खात्याच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी गैरमार्गाने या प्रकरणाची पाठराखण तर केलीच, पण यासाठी लागणार्‍या विविध परवानग्या देखील कोणतीही खातरजमा न करता देण्यात आल्याचे या प्रकरणातून अधोरेखीत झाले आहे. या मुळे यातील दोषी अधिकारी देखील सुटता कामा नये अशी भूमिका छत्रपती शिवाजी ब्रिगेडने घेतली आहे.

Protected Content