आ.सावकारे यांचा पिंपळगाव येथे प्रचार

sanjay savkare 1

 

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, आरपीआय, रासप, राजप या महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांनी आज (दि.12) तळवेल परिसरातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेत महर्षी वाल्मीकी तर पिंपळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचाराचा प्रारंभ केला.

आज (दि.12) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आ. सावकारे यांनी वरणगाव येथील आयुध निर्माणी फॅक्टरीतील प्रवेश द्वाराजवळ कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आणि आ. सावकारे यांनी सकाळी सात वाजेपासून प्रचाराचा प्रारंभ केला. ऑडनस फॅक्टरी येथे गेल्यानंतर त्यांनी कामावर येणारे व जाणारे कर्मचा-यांच्या भेटीगाठी घेऊन मतदान करण्यासाठी आवाहन केले. तर सुसरी येथून प्रचाराचा प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी पिंपळगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, ओझरखेडा, बोहर्डी बुद्रुक, बोहर्डी खुर्द, दर्यापूर, तळवेल आदी गावात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी आ.सावकारे यांनी थोरा – मोठ्यांचे आशीवार्द घेतले. त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये युवकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील महिलांनी आ. सावकारे यांचे औक्षण करुन स्वागत केले.

या प्रचार फेरीप्रसंगी तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, जि.प. माजी सदस्य राजेंद्र चौधरी, पं.स.चे माजी सभापती राजेंद्र चौधरी, सुनील महाजन, माजी उपसभापती गोलू पाटील, कृउबा. समितीचे माजी सभापती सोपान भारंबे, शेतकी संघाचे संचालक प्रशांत निकम, खडका येथील चुडामण भोळे, दीपक भिरूड, संजय पाटील, भैय्या महाजन, वरणगाव येथील नगरसेवक गणेश धनगर, निंभोरा येथील माजी सरपंच गुरुजित्सिंग चाहेल, माजी उपसरपंच राजू साबळे, वेल्हाळे येथील सरपंच विजय पाटील, प्रशांत पाटील, जि.प.माजी सदस्य संजय पाटील, तळवेल येथील सरपंच डॉ. सुनील पाटील, माजी सभापती मंगला झोपे, माजी सरपंच ज्ञानदेव झोपे, विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत पाटील, रविंद्र पाटील, अर्जुन इंगळे, सुधाकर सरोदे, मंगेश पाटील, कपिल वायकोळे, बोहर्डी येथील सरपंच निलेश पाटील, उपसरपंच एकनाथ पाटील, वासुदेव पाटील, अनिल पाटील, रामा पाटील, दर्यापूर येथे पी.एस.पाटील, विलास पाटील, संदीप पाटील, पिंपळगाव बुद्रुक येथील सरपंच वासुदेव सरोदे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप सरोदे, उपसरपंच निवृत्ती पाटील, प्रितेश बेंडाळे, नीलेश बेंडाळे, देवानंद बावस्कर, प्रमोद सरोदे, वासुदेव सरोदे, पिंपळगाव खुर्द येथे अरुण इंगळे, अनिल पाटील, तुषार पाटील, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, विनोद राजपूत, पिंटू वारके, समाधान शिंदे, योगेश जोहरे, रवींद्र पाटील, माजी सरपंच पुंडलिक सुरवाडे, शिवाजी, देवानंद, गोपाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी उपस्थितीत होते.

Protected Content