निवडणूक प्रचार खर्च सादर न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

रावेर, प्रतिनिधी | रावेर विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या पाच उमेद्वारांनी निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्यामुळे त्या उमेद्वारांना नोटीस पाठवून चोविस तासाची मुदत देण्यात आली आहे. खर्च सादर न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी दिली.

भारत निवडणूक आयोग निवडणूक खर्च नियंत्रण अनुदेशानुसार रावेर विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना  ( ता. १०) रोजी निवडणूक प्रचार खर्चाबाबत दुरध्वनी संदेश देवून निवडवूक खर्च हिशोब नोंद वहीचे तपासणी कामी निवडणूक खर्च निरिक्षक यांचे तपासणी कामी बोलवण्यात आले होते. मात्र विवेक दिनेश ठाकरे, संतोष मधुकर ढिवरे, गयासउद्दीन सदरोद्दीन काझी, राजाराम माधव सोनार व हाजी मुश्ताक सैय्यद कमरोद्दीन हे पाच उमेद्वार अनुपस्थित राहिले. या पाच उमेद्वारांनी निवडणूक आयोगाच्या प्राप्त सुचनांची अवहेलना केल्याचे निदर्शनास आले आहे . सदर पाचही उमेद्वारांनी २४ तासाच्या आत विना विलंब खर्च सादर करावा मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम ७७ अन्वये कार्यवाही करण्यात येईल .

Protected Content