भारतीय अर्थव्यवस्थेची चिंताजनक परिस्थितीकडे वाटचाल – राजन

rajan

नवी दिल्ली प्रतिनिधी । वाढत्या आर्थिक संकटामुळे आशियातील तिसरी मोठी भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक परिस्थितीकडे वळत आहे. असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन ब्राऊन विद्यापीठात ओपी जिंदाल व्याख्यानमाले दरम्यान बोलत होते.

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या वित्तीय तुटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘गेली अनेक वर्षे उत्तम कामगिरी करून भारतीय अर्थव्यवस्थेने लक्षणीय पातळी गाठली आहे. २०१६ च्या पहिल्या तिमाहीत विकास दर ९% होता.’ भारतीय अर्थव्यवस्था सुस्तीच्या टप्प्यातून जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढीचा दर सहा वर्षांच्या निचांकी पातळीवर म्हणजेच ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहित तो ५.३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. खरी समस्या म्हणजे विकासाचे नवीन स्रोत शोधण्यात भारत अपयशी ठरला आहे.

Protected Content