यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शैक्षणिक वर्ष २०२४ आणी २०२५या वर्षांसाठी शिक्षण हक्क अधिनियम आरईटीच्या माध्यमातुन नागरीकांना आपल्या बालकांना मोफत शिक्षणासाठी २५ टक्के आरक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी संपुर्ण राज्यात सुधारीत प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन पद्धतीने आज दिनांक १७ मे पासुन सुरुवात करण्यात आली असुन ४ जुन२०२४मध्ये विद्यार्थी पालकांनी तात्काळ या प्रवेशप्रक्री सहभाग घेत आपल्या मुलींसाठी व मुलांची मोफत प्रवेश मिळुन घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या नविन शैक्षणीक नियमानुसार आर्थिक दुर्बल घटक आपल्या हक्काच्या शिक्षणापासून वंचीत राहू नये याकरीता या शैक्षणिक नियमांची तात्काळ अमलबजावणी करण्यात आली असुन,यात आर्थिक व सामाजिकदृष्टया मागासलेल्या घटकांसाठी विद्यार्थी राहात असलेल्या परिसरापासुन खाजगी शाळा ही १ किलोमिटर लांबीवर राहणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना मोफत (विनामुल्य) शिक्षण मिळणार आहे . दरम्यान यावल तालुक्यातील एकुण १७ खाजगी असलेल्या शाळेत प्रवेश मिळवण्याचे प्रक्रीयेला सुरूवात झाली असून दिनांक १७ मे ते ३१ मे या कालावधीत पर्यंत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती यावल तालुका गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली होती ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असलेल्या प्रक्रीयेतुन कोणत्याही पालकाचे बालक हे आपल्या शिक्षणाच्या अधिकारा पासुन वंचीत राहू नये या दृष्टीकोणातुन पुणे प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी ऑनलाईन प्रक्रीयेची मुदत ४ जुन२०२४पर्यंत वाढवली असुन, पालकांनी शासनाच्या या मोफत शिक्षण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आहे . सदरच्या शासन आदेशाची अमलबजावणी न करणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांवर कायद्याशीर कार्यवाही करण्यात येईल असे ही यावलचे गटशिक्षणधिकारी धनके यांनी म्हटले आहे.