पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मागील वर्षी सहन करावा लागलेला उन्हाळा अतिशय भयानक असल्याने भविष्यात तापमान वाढ होत आहे त्याकरिता या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचा संकल्प पाळधी येथील स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी केला असून नुकतेच त्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले व सोबत झाडाच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड सुद्धा बसविण्यात आले यानंतर गावातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांचे सोबत माजी सरपंच सोपान पाटील, ग्रा प सदस्य मनोज नेवे, डॉ जितेंद्र पाटील,कन्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद कोळी, निलेश भोबे, प्रवीण माळी, विनोद पाटील,मुरलीधर सुरवाडे, नाना नागपूरे, अतुल बाविस्कर, मुख्याध्यापक तुळशीराम वाघ मुख्याध्यापिका चंद्रप्रभा सोनवणे संभाजी हावडे, चंदनसिंग राजपूत, प्रकाश कुमावत, अमित मुंडे, जितेंद्र नाईक,सतिष बावस्कर इ उपस्थित होते

Protected Content