कॅन्सरग्रस्त परिवारातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

chopada 1

चोपडा प्रतिनिधी । येथील जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेन्शन हेल्प सेंटरतर्फे कॅन्सरग्रस्त परिवारातील मुला-मुलींना शैक्षणिक सहित्याचे वाटप माजी विधान सभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ. हरतालकर, चंद्रहास गुजराथी, जीवन चौधरी, गजेंद्र जायसवाल, इरफ़ान सालार, रवि मराठे, सैय्यद असगर अली, सेठ हाजी महेबुब पठान, अकरम तेली अकील जहागीरदार, अशपाक पठान, जुनेद मेमबर यांचा प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच वह्याची देणगी डॉ. अब्दुल करीम सालार, चेअरमन इकरा एजुकेशन सोसाइटी जळगाव व स्कूल बॅग डॉ. काजिम मलिक मुंबई खैर उम्मत फॉउडेशनतर्फे देण्यात आले. कार्यक्रमाचे
सूत्र संचालन जाकिर यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष अकरम यांनी मानले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद शिकलगर व सदस्य मेहमूद जलीस इंजीनियर डॉ. नवाज शा ताहेर खान, शहबाज खान, बिलाल शैख़, सत्तार अहलेकार यांनी परिश्रम घेतले.

Protected Content